वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede stadium) क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे. या पुतळ्याचे अनावरण 24 एप्रिलला सचिन तेंडुलकरच्या 50 व्या वाढदिवसाला किंवा यंदाच्या विश्वचषकादरम्यान केले जाऊ शकते अशी माहिती क्रिकेट अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. सचिन तेंडुलकरने भारतासाठी 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (100) आणि धावा (34,357) करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. मुंबई क्रिकेट असोशिएशनने (MCA) हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयावर सचिन तेंडूलकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पहा व्हिडीयो -
#WATCH | Mumbai: On his life-size statue being erected inside Wankhede stadium by MCA, Cricket legend Sachin Tendulkar says, "Pleasant surprise. My career started here. It was a journey with unbelievable memories. Best moment of my career came here when we won 2011 World Cup..." pic.twitter.com/OAHPP7QkSB
— ANI (@ANI) February 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)