आसाम संघाचा कर्णधार आणि आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रायन पराग (Riyan Parag) काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पहिल्या इमर्जिंग आशिया कपमध्ये रायनने बॅट आणि बॉलने चमत्कार केले. त्यानंतर तो विजय हजारे ट्रॉफीमध्येही चमकला. आता त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (SMAT) विश्वविक्रम केला आहे. त्याने टी-20 स्पर्धेत सलग सहावे अर्धशतक झळकावले आहे. यासह त्याने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. याआधी, जगभरातील कोणत्याही टी-20 लीग किंवा टूर्नामेंटमध्ये असे कधीच घडले नव्हते की एका फलंदाजाने सलग सहा सामन्यांमध्ये पन्नास धावा केल्या असतील. यासह पराग या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने सात सामन्यांच्या सात डावात 440 धावा केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)