आयसीसी विश्वचषक 2023 चा 37 वा (ICC Cricket World Cup 2023) सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव केला. भारताने 8 सामन्यात सलग 7 विजय मिळवले आहेत. सध्या तो पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 326 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 83 धावांवर गारद झाला. या सामन्यात विराट कोहलीने 101 धावांची नाबाद खेळी केली. यासह विराटने वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. विराटने कारकिर्दीतील 49 वे शतक झळकावले. तर गोलंदाजीत अष्टपैलू रवींद्र जडेजाने 5 बळी घेतले. विश्वचषकात 5 बळी घेणारा युवराज सिंगनंतरचा दुसरा फिरकी गोलंदाज ठरला. दरम्यान, सामना संपल्यानंतर रोहित शर्माने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षक पदक जिंकले. याचा व्हिडिओ बीसीसआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023: विश्वचषक 2023 मधील खराब कामगिरीमुळे श्रीलंका क्रिकेट बोर्ड अडचणीत, क्रीडामंत्र्यांनी उचललं टोकचं पाऊल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)