ICC Cricket World Cup 2023: विश्वचषक 2023 मधील खराब कामगिरीमुळे श्रीलंका क्रिकेट बोर्ड अडचणीत, क्रीडामंत्र्यांनी उचललं टोकचं पाऊल

टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण इतके वाढले की सरकारने सोमवारी श्रीलंका क्रिकेट बोर्ड प्रशासनाला बरखास्त केले. भारताविरुद्धच्या पराभवानंतर रणसिंघे यांनी शम्मी सिल्वा यांच्या नेतृत्वाखालील एसएलसी मधून राजीनामा मागितल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

ICC Cricket World Cup 2023: विश्वचषक 2023 मधील खराब कामगिरीमुळे श्रीलंका क्रिकेट बोर्ड अडचणीत, क्रीडामंत्र्यांनी उचललं टोकचं पाऊल
Sri Lanka Team (Photo Credit - Twitter)

2023 च्या विश्वचषकात (ICC Cricket World Cup 2023) भारताकडून श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डात (SCB) घबराट पसरली होती. टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण इतके वाढले की सरकारने सोमवारी श्रीलंका क्रिकेट बोर्ड प्रशासनाला बरखास्त केले. भारताविरुद्धच्या पराभवानंतर रणसिंघे यांनी शम्मी सिल्वा यांच्या नेतृत्वाखालील एसएलसी मधून राजीनामा मागितल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पराभवानंतर सिल्वा प्रशासनाच्या राजीनाम्याची मागणी करत एसएलसी कॅम्पससमोर निदर्शनेही करण्यात आली. (हे देखील वाचा: SL vs BAN ICC World Cup 2023 Live Streaming: विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश - श्रीलंका आमनेसामने, लंकेसाठी आजचा सामना 'करो या मरो'चा; येथे पाहा लाइव्ह)

क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी माजी विश्वचषक विजेत्या कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम सात सदस्यीय समिती नेमली, असे द टेलिग्राफने वृत्त दिले आहे. याशिवाय क्रीडा मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रणसिंगे यांनी 1973 च्या क्रीडा अधिनियम क्रमांक 25 अंतर्गत समितीची नियुक्ती केली आहे. रणसिंगे यांनी नियुक्त केलेले राष्ट्रीय क्रीडा परिषदेचे प्रमुख रणतुंगा सिल्वा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सिल्वा यांची मे महिन्यात सलग तिसर्‍यांदा SLC प्रमुख म्हणून निवड झाली जी 2025 पर्यंत चालणार होती.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर वादाला फुटले तोंड

2 नोव्हेंबरला विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात श्रीलंकेचा संघ अवघ्या 55 धावांत सर्वबाद झाला होता. यानंतर संघाच्या प्रशिक्षक आणि व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, सामन्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षकही खेळाडूंचा बचाव करताना दिसले.

(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2023 12:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).