भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 च्या (Border-Gavaskar Trophy) पहिल्या कसोटीत शानदार शतकासह सुरुवात केली आहे. नागपूर कसोटीत कांगारू संघ अवघ्या 177 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने रोहितच्या शतकाच्या जोरावर सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. रोहित शर्माने 171 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केले. या शतकासह हिटमॅनने ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथलाही मागे टाकले. इतकेच नाही तर भारतीय कर्णधाराने ते केले जे याआधी भारतासाठी कोणताही कर्णधार करू शकला नाही. त्याचबरोबर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील रोहित शर्माचे हे पहिले शतक आहे. त्याचबरोबर कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधारही ठरला. त्याच्या आधी विराट कोहलीपासून एमएस धोनीपर्यंत कोणीही हे करू शकले नाही.
Historic - Rohit Sharma is the first ever captain to score a century in all the 3 formats for India.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)