KKR vs RCB, IPL 2025 1st T20 Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 आजपासून सुरूवात झाली आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स क्रिकेट संघ (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट संघ (RCB) यांच्यात कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. केकेआरने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्याच वेळी, आरसीबी संघाला आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. या हंगामात, केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, आरसीबीची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फिलिप साल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
🚨Toss🚨
It's Game 1⃣ and @RCBTweets won the toss and elected to field against @KKRiders
Updates ▶️ https://t.co/C9xIFpQDTn#TATAIPL | #KKRvRCB pic.twitter.com/6O1pRU8ScS
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)