Pahalgam Terror Attack: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल 2025 (IPL 2025) सामन्यापूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्पर्धेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की खेळाडू आणि पंच काळ्या पट्ट्या बांधतील, आतषबाजी होणार नाही आणि चीअरलीडर्स मैदानावर उपस्थित राहणार नाहीत. याशिवाय, हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळ सुरू होण्यापूर्वी एक मिनिट शांतता पाळली जाईल. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा आदेश आला आहे. ज्यामध्ये 26 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले. 22 एप्रिल रोजी झालेल्या या क्रूर हल्ल्याचा अनेक माजी आणि आजी भारतीय क्रिकेटपटूंनीही निषेध केला आहे.
Breaking
Ahead of Phalagam Attack : Players and umpires to wear black armbands in today's match also One minute silence before the start of the match and there will be no cheerleaders today also no fireworks : BCCI @BCCI #Phalagamattack
— vipul kashyap (@kashyapvipul) April 23, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)