एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये, 2 नोव्हेंबर रोजी भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात एकीकडे श्रीलंकेकडून अत्यंत खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, तर दुसरीकडे भारतीय संघाच्या खेळाडूंनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केले. सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या खेळाडूंनी अनेक अवघड झेलही घेतले. प्रत्येक सामन्याप्रमाणे या सामन्यानंतरही भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांना सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी पदक देण्यात आले. ड्रेसिंग रूममधून ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) प्रथम फलंदाजी करताना चमकदार कामगिरी केली. या सामन्यात अय्यरने 56 चेंडूत 82 धावांची तुफानी खेळी केली. यानंतर श्रेयसने क्षेत्ररक्षणातही अप्रतिम कामगिरी केली. सामन्यादरम्यान अय्यर स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना मोहम्मद सिराजच्या चेंडूवर त्याने शानदार झेल घेतला. यानंतर श्रेयस अय्यरला टीम ड्रेसिंग रूममध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी पदक देण्यात आले. (हे देखील वाचा: AFG vs NED ICC World Cup 2023 Live Straming: विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड-अफगाणिस्तान प्रथमच आमनेसामने, उपांत्य फेरीच्या आशा कायम; येथे पाहा लाइव्ह)
पाहा व्हिडिओ
The Medal Ceremony 🏅 in the dressing room just attained "LEGENDARY" status 🙌🏻#TeamIndia was in for a surprise when someone 𝗜𝗡𝗦𝗣𝗜𝗥𝗔𝗧𝗜𝗢𝗡𝗔𝗟 announced the best fielder award 🫡🔝#CWC23 | #MenInBlue | #INDvSL
WATCH 🎥🔽 - By @28anand
— BCCI (@BCCI) November 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)