चेन्नईतील एमए चिदंबरम क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बुधवारी (18 ऑक्टोबर) आयसीसी विश्वचषक 2023 च्या 16व्या सामन्यात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे (NZ vs AFG) संघ आमनेसामने आहे. अशा स्थितीत या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध न्यूझीलंडचा वरचष्मा असेल. न्यूझीलंडचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने इंग्लंड, नेदरलँड आणि बांगलादेश यांना पराभूत करत वर्ल्ड कपमध्ये सलग तीन सामने जिंकले आहेत. बांगलादेश आणि भारताविरुद्धचे पहिले दोन सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तानने तिसर्‍या सामन्यात इंग्लंडचा पराभव करून विश्वचषकाच्या इतिहासात दुसरा विजय नोंदवला. दरम्यान, अफगाणिस्तानने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत न्युझीलंडसघांने अफगाणिस्तानसमोर 289 धावाचे लक्ष्य ठेवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)