Hazratullah Zazai's 2-Year-Old Daughter Passes Away: अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Afghanistan National Cricket Team) चा स्फोटक सलामीवीर हजरतुल्लाह झझाई (Hazratullah Zazai) यांच्या दोन वर्षांच्या मुलीचे 14 मार्च (शुक्रवारी) रोजी निधन झाले. त्यांचे सहकारी आणि जवळचे मित्र करीम जनत यांनी या दुःखद बातमीची पुष्टी केली. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यात लिहिले आहे की, 'माझ्या भावाचा जवळचा मित्र हजरतुल्लाह झझाई यांच्या दोन वर्षांच्या मुलीचे निधन झाले. हे कळवताना खूप दुःख होत आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहे. या मोठ्या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना कृपया त्यांना तुमच्या प्रार्थनांमध्ये ठेवा.
हजरतुल्लाह झझाई यांच्या दोन वर्षांच्या मुलीचे निधन
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)