ICC Champions Trophy 2025 ENG vs AFG: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आज म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी ग्रुप स्टेजचा 8वा सामना सुरू आहे, ज्यामध्ये अफगाणिस्तान आणि इंग्लंड संघ आमनेसामने आहेत. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 3 विकेट घेत इतिहास रचला. तो आता इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 50 बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने जेम्स अँडरसनचा विक्रम मोडला, त्याने 31 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. आर्चरने फक्त 30 सामन्यांमध्ये 50 विकेट्सचा टप्पा गाठला आहे. जोफ्रा आर्चरने पाचव्या षटकात अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज रहमानउल्लाह गुरबाजला बाद करून ही कामगिरी केली.
Jofra Archer becomes the fastest to 50 wickets in men's ODIs for England ⚡️ pic.twitter.com/5Nxf3KyUyp
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 26, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)