MI vs LSG, IPL 2024 67th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 67 वा सामना (IPL 2024) आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (MI vs LSG) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. हा सामना जिंकून मुंबई इंडियन्सला चांगला निरोप घ्यायचा आहे. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सला हा सामना जिंकून त्यांचा निव्वळ धावगती सुधारायचा आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. या कालावधीत मुंबई इंडियन्सने 4 सामने जिंकले असून 9 सामने गमावले आहेत. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सनेही या मोसमात आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. लखनऊ सुपर जायंट्सने 6 जिंकले आहेत आणि 7 सामने गमावले आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
मुंबई इंडियन्स: ईशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा.
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान.
Match 67. Mumbai Indians Won the Toss & elected to Field https://t.co/VuUaiv4G0l #TATAIPL #IPL2024 #MIvLSG
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)