भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आजकाल बहुतेक वेळ रांची येथील त्याच्या फार्महाऊसवर व्यतीत करत आहे. या ठिकाणी तो आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. आपण पाहिलेच असेल की, धोनी सोशल मीडियावर खूप कमी सक्रिय आहे. आता दोन वर्षानंतर धोनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो ट्रॅक्टरने शेत नांगरताना दिसत आहे.

धोनीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'काहीतरी नवीन शिकणे चांगले आहे, परंतु काम पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागला.' धोनी एखाद्या अस्सल शेतकऱ्यासारखे शेतात नांगरणी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. एमएस धोनी रांचीमधील त्याच्या फार्महाऊसवर भाज्या आणि फळे पिकवतो. याची छायाचित्रे आणि व्हिडिओ आधीच व्हायरल झाली आहेत. आता धोनी शेतीमधील कामेही आवडीने करू लागला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)