भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तब्बल 20 वर्षांनंतर बुधवारी त्याच्या मूळ गावी ल्वाली येथे पोहोचला. इथे गावकऱ्यांनी धोनीचे जल्लोषात स्वागत केले. या ठिकाणी त्याने पत्नी साक्षीसोबत गावातील मंदिरांमध्ये पूजा केली आणि वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली. यावेळी वडीलधाऱ्यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले, तसेच सर्वांची प्रेमाने चौकशी केली. साक्षीने गावातील महिलांशीही खूप गप्पा मारल्या. धोनीने गावातील तरुण व मुलांना क्रिकेटच्या टिप्स देण्यात सुमारे अडीच तास घालवले. सध्या याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. अल्मोडा जिल्ह्यातील जैती तहसीलमधील ल्वाली हे महेंद्रसिंग धोनीचे वडिलोपार्जित गाव आहे. मंगळवारी नैनितालला पोहोचलेला माही बुधवारी सकाळी 11.45 वाजता पत्नी साक्षीसह त्याच्या मूळ गावी पोहोचला. (हेही वाचा: World Cup 2023 Final: अहमदाबाद येथे खेळला जाणार आयसीसी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना; PM Narendra Modi उपस्थित राहण्याची शक्यता- Reports)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)