World Cup 2023 Final: अहमदाबाद येथे खेळला जाणार आयसीसी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना; PM Narendra Modi उपस्थित राहण्याची शक्यता- Reports
रविवारी हा सामना पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील अहमदाबादमध्ये उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान मोदी हे प्रचंड क्रिकेट चाहते आहेत. संघाने उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अंतिम फेरी गाठल्याबद्दल खेळाडूंचे अभिनंदन केले होते.
रविवारी म्हणजेच 19 नोव्हेंबरला भारतीय संघ वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना (World Cup 2023 Final) खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाचा अंतिम सामना सेमी-फायनल 2 च्या विजेत्याशी होणार आहे. अहवालानुसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबाद स्टेडियमवर उपस्थित राहू शकतात. न्यूज वेबसाईट दैनिक जागरणने याबाबत वृत्त दिले आहे.
भारतीय संघाने चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघ तीनदा अंतिम फेरीत पोहोचला होता. 1983 साली भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच विश्वचषक जिंकला होता. 2003 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजयाची नोंद करण्यात अपयशी ठरला होता. पण 2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एकदा ट्रॉफीवर कब्जा केला.
आता 12 वर्षांनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममधून जात आहे. भारतीय खेळाडू बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत चांगली कामगिरी करत आहेत. अशा स्थितीत भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे. उपांत्य फेरीत न्युझीलंडचा 70 धावांनी पराभव करून भारताने आपले ताकद आणि प्रबळ इच्छाशक्ती दाखवून दिली आहे.
आता सर्वांच्या नजरा अंतिम सामन्याकडे लागल्या आहेत. सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमी फायनल-2 चालू आहे. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल त्याच्याशी भारताचा अंतिम सामना होणार आहे. रविवारी हा सामना पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील अहमदाबादमध्ये उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान मोदी हे प्रचंड क्रिकेट चाहते आहेत. संघाने उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अंतिम फेरी गाठल्याबद्दल खेळाडूंचे अभिनंदन केले होते.
(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2023 07:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

