Sharmajee Ki Beti: प्राइम व्हिडिओने ताहिरा कश्यप खुराना दिग्दर्शित डेब्यू चित्रपट 'शर्माजी की बेटी' च्या खास प्रीमियरची घोषणा केली आहे. ॲप्लॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि एलिपसिस एंटरटेनमेंट प्रॉडक्शन निर्मित, या स्लाईस-ऑफ-लाइफ कॉमेडी चित्रपटाचा 28 जून रोजी खास वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर खूपच क्रिएटिव्ह असल्याने चित्रपटात कॉमेडी असल्याचे दिसते. 'शर्माजी की बेटी'चे लेखन आणि दिग्दर्शन ताहिरा कश्यप खुराणा यांनी केले आहे. साक्षी तन्वर, दिव्या दत्ता आणि सैयामी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत वंशिका टपरिया, अरिस्ता मेहता, शारीब हाश्मी आणि परवीन डबास हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)