MI vs RR IPL 2021 Match 24: आयपीएलच्या (IPL) 24व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने  (Rajasthan Royals) पहिले फलंदाजी करून फलंदाजांच्या जोरदार कामगिरीच्या जोरावर 4 विकेट गमावून 171 धावांपर्यंत मजल मारली आणि मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजयासाठी 172 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. रॉयल्सकडून कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) सर्वाधिक 42 धावा केल्या तर जोस बटलरने (Jos Buttler) 41 आणि शिवम दुबेने 35 धावा व यशस्वी जयस्वालने 32 धावांचे योगदान दिले. डेविड मिलर 7 धावा आणि रियान पराग 8 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, मुंबईच्या गोलंदाजांनी आज निराशाजनक प्रदर्शन केले. राहुल चाहरने 2 विकेट्स काढल्या तर ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 1 विकेट काढली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)