MI vs KKR, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 60 वा (IPL 2024) सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स (KKR vs MI) यांच्यात ईडन गार्डन्सवर (Eden Gardens, Kolkata) खेळवला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. केकेआरचा हा नववा विजय असून तो 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यासह कोलकाता आयपीएल 2024 सीझनच्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. तत्तपुर्वी, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमवाल्यानंतर प्रथम फलंदांजी साठी आलेल्या केकेआरने मुंबईसमोर 158 धावांचे लक्ष्य ठेवले. कोलकाता नाईट रायडर्सकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. मुंबई इंडियन्सकडून पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर इशान किशनने सर्वाधिक 40 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)