IPL 2024 Auction: आयपीएल 2024 चा लिलाव भारतात नाही तर या देशात होणार, तारीख आली समोर

आयपीएल 2024 च्या लिलावात, प्रत्येक संघासाठी पगाराची रक्कम 100 कोटी रुपये असेल, जी आयपीएल 2023 च्या खेळाडूंच्या लिलावात 5 कोटी रुपयांनी वाढली आहे.

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 चा लिलाव भारतात नाही तर या देशात होणार, तारीख आली समोर

इंडियन प्रीमियर लीगबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा लिलाव पुढील महिन्यात म्हणजेच 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात भारताबाहेर लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ असेल. आयपीएल 2024 च्या लिलावात, प्रत्येक संघासाठी पगाराची रक्कम 100 कोटी रुपये असेल, जी आयपीएल 2023 च्या खेळाडूंच्या लिलावात 5 कोटी रुपयांनी वाढली आहे. एका अहवालानुसार, संघांना 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत जाहीर झालेल्या खेळाडूंची यादी शेअर करावी लागेल. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023: फायनलपूर्वी चाहत्यांच्या खिशावर होणार परिणाम, हॉटेलपासून फ्लाइटपर्यंत सर्वच वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2023 07:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).