IPL 2022, RCB vs KKR Match 6: आयपीएलच्या सहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघ 18.5 षटकांत फक्त 128 धावांवर गारद झाला आहे. उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्या अखेरच्या षटकांत छोटेखानी योगदानच्या जोरावर केकेआरने सन्मानजनक धावसंख्या गाठली. अशा प्रकारे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजयासाठी फक्त 129 धावांचे लक्ष्य मिळाले. आरसीबीच्या भेदक गोलंदाजीपुढे केकेआरचे फलंदाज अक्षरशः धराशाई झाले. संघाचा धाकड अष्टपैलू आंद्रे रसेल याने सर्वाधिक 25 धावा केल्या. तर आरसीबीसाठी वानिंदू हसरंगा याने चार विकेट घेतल्या. तर आकाश दीप याने 3, हर्षल पटेल याला दोन, तसेच मोहम्मद सिराज याच्या खात्यात एक विकेट राहिली.
Innings Break!
Brilliant bowling effort from #RCB as #KKR are bowled out for 128 in 18.5 overs.
Hasaranga (4/20), Harshal (2/11)
Scorecard - https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/A22NVk04bW
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)