इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या सुरुवाती पूर्वीच सहभागी होणाऱ्या खेळाडूंपैकी बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाली आहे आणि यात आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) अष्टपैलू क्रिकेटपटू डॅनियल सॅम्स (Daniel Sams) याची भर पडली आहे. बेंगलोर फ्रँचायझीने दिलेल्या माहितीनुसार, डॅनियल 3 एप्रिल रोजी चेन्नई येथे संघात सहभागी होता. त्यावेळी त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता मात्र बुधवार, 7 एप्रिल रोजी झालेल्या दुसऱ्या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे त्यामुळे त्याला इतर खेळाडूंपासून वेगळे विलिगीकरणात ठेवण्यात आले आहे. यापूर्वी संघाचा सलामी फलंदाज देवदत्त पडिक्क्लही (Devdutt Padikkal) कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)