आयपीएलच्या (IPL) दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 5 विकेट गमावून 135 धावांपर्यंत मजल मारली. अशाप्रकारे कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) विजयासाठी अवघ्या 136 धावांचे टार्गेट मिळाले आहे. आजच्या सामन्यात केकेआर गोलंदाजांपुढे दिल्लीचा एकही फलंदाज तग धरून अधिक काळ टिकू शकला नाही. दिल्लीसाठी सलामीवीर शिखर धवनने 36 धावा केल्या. तर श्रेयस अय्यर 30 धावा करून नाबाद परतला. तसेच कोलकातासाठी वरुण चक्रवर्तीने दोन विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)