IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. तत्तपुर्वी, दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. पहिल्या सामन्यात सामान्य दिसणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दरम्यान, पहिल्या डावात फलंदांजीसाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे. रोहित शर्मा 39 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 94/2
2ND Test. 15.6: Marco Jansen to Shubman Gill 4 runs, India 90/2 https://t.co/PVJRWPfGBE #SAvIND
— BCCI (@BCCI) January 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)