IND vs SA 1st Test Day 3: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावाच 408 धावा केल्या असुन यासह त्यांनी भारतावर 163 धावांची आघाडी घेतली आहे. यामध्ये डीन एल्गरने 185 आणि मार्को जॅनसेनने 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. जसप्रीत बुमराहने 4, सिराज 2, प्रसिध, अश्विन, शार्दुलने प्रत्येकी 1 बळी घेतला. याआधी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तत्तपुर्वी, टीम इंडियाचा पहिला डाव 67.4 षटकात 245 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियासाठी केएल राहुलने सर्वाधिक 101 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 बळी घेतले. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला तिसरा झटका बसला. भारताची धावसंख्या 52-3 (13.6 Ovs)
1ST Test. WICKET! 13.6: Shubman Gill 26(37) b Marco Jansen, India 52/3 https://t.co/032B8Fn3iC #SAvIND
— BCCI (@BCCI) December 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)