Australia Men's National Cricket Team vs India National Cricket Team: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना ॲडलेड येथील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. आज, रविवार, 8 डिसेंबर रोजी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 19 धावा करायच्या आहेत. भारताने तिसऱ्या दिवसाची सुरुवात 128/5 अशी केली आणि संघ 175 धावांत आटोपला. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 180 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेडच्या झंझावाती शतकाच्या जोरावर 337 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 157 धावांची आघाडी मिळाली. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या डावात 128 धावांवर 5 विकेट गमावल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडिया 29 धावांनी मागे होती.
Australia can see the 1-1 now ⌛️https://t.co/wfMJTYdmOw | #AUSvIND pic.twitter.com/dNijj8Pd9U
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)