India vs Australia 2nd Test 2024 Day 3 Live Score Update: तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू, भारताला सहावा धक्का; स्टार्कने पंतला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्याच षटकात ऋषभ पंत बाद झाला. त्याने 31 चेंडूत 28 धावा केल्या. तो मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथच्या हाती झेलबाद झाला. भारताचा स्कोर 136/6

India vs Australia 2nd Test 2024 Day 3 Live Score Update: तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू, भारताला सहावा धक्का; स्टार्कने पंतला पॅव्हेलियनमध्ये पाठवले
Rishabh Pant (Photo Credit - X)

Australia Men's National Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हलवर (Adelaide Oval) खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 24 षटकात 5 गडी गमावून 128 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. याआधी दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 44.1 षटकात केवळ 180 धावा केल्या. प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेला संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 87.3 षटकांत 337 धावा करून सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 157 धावांची आघाडी घेतली होती. दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्याच षटकात ऋषभ पंत बाद झाला. त्याने 31 चेंडूत 28 धावा केल्या. तो मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथच्या हाती झेलबाद झाला. भारताचा स्कोर 136/6

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).