IND vs AUS 2nd Test 2024: ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यातील सामन्यादरम्यान वातावरण खुपच गरम दिसले. गुलाबी चेंडूच्या या कसोटीत मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) खूपच आक्रमक दिसत होता. मार्नस लॅबुशेननंतर त्याची ट्रॅव्हिस हेडशीही (Travis Head) लढत झाली. यानंतर ऑस्ट्रेलियन चाहते त्याच्या पाठी लागले आणि त्याची डिवचू लागले. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि मीडिया देखील त्याच्यावर टीका करताना दिसले, मात्र सिराजने नंतर हेडचे आरोप फेटाळून लावले. आता त्यांच्या वादाच्या प्रकरणात आयसीसीने दखल घेतली असुन दोघांना दोषी ठरवले आहे. माहितीनुसार आयसीसीने आता या प्रकरणाची दखल घेतली असून दोन्ही खेळाडूंना शिस्तभंगाच्या सुनावणीसाठी बोलावले आहे. यावेळी ते दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणार आहे. तथापि, दोन्ही खेळाडूंना काळजी करण्यासारखे काही नाही, कारण त्यांना कोणत्याही प्रकारच्या निलंबनाचा सामना करावा लागणार नाही. रिपोर्टनुसार, कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजसाठी आयसीसीच्या आचारसंहितेत फारच कमी शिक्षा आहे. ॲडलेडमध्ये पिंक बॉल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी सिराज आणि हेड यांच्यात शाब्दिक युद्ध झाले.
JUST IN
The pair are set to be punished for the incident.https://t.co/vZn89Pa25J
— Fox Cricket (@FoxCricket) December 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)