IND-W Beat UAE-W, Asia Cup 2024 5th Match: महिला आशिया कप 2024 सुरु झाला आहे. आशिया चषक स्पर्धेतील पाचवा सामना भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने संयुक्त अरब अमिरातीचा 78 धावांनी पराभव केला आहे. या मोठ्या विजयानंतर टीम इंडियाने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. तत्पूर्वी, यूएईची कर्णधार ईशा रोहित ओझाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 201 धावा केल्या. टीम इंडियासाठी स्टार फलंदाज हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 66 धावांची खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करताना यूएई संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 123 धावा करता आल्या. यूएईसाठी स्टार अष्टपैलू कविशा अगोर्गेने नाबाद 40 धावा केल्या. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. टीम इंडियाचा पुढचा सामना मंगळवारी म्हणजेच 23 जुलै रोजी नेपाळशी होणार आहे.
2⃣ wins in 2⃣ Matches 🙌
Another clinical performance, another comprehensive victory for #TeamIndia as they beat the United Arab Emirates by 78 runs 👌
Scorecard ▶️ https://t.co/fnyeHav1sS#WomensAsiaCup2024 | #ACC | #INDvUAE
📸 ACC pic.twitter.com/NaKha21O7m
— BCCI Women (@BCCIWomen) July 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)