भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघ यांच्यात आज पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघ प्रत्येकी एक सामना जिंकून मालिकेत बरोबरीत आहेत. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने टीम इंडियाचा 13 धावांनी पराभव केला होता. तर दुसऱ्या T20 सामन्यात भारताने दमदार पुनरागमन करत यजमान संघाचा 100 धावांनी पराभव केला. दरम्यान, तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 4 गडी गमावून 182 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 66 धावांची खेळी खेळली. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा आणि ब्लेसिंग मुझाराबानी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी झिम्बाब्वे संघाला 20 षटकात 183 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. ब्रायन बेनेट 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. तर सिकंदर रझा हा 15 धावाकरून बाद झाला. भारताकडून आवेश खानने दोन, खलिल अहमद आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत. झिम्बाब्वे संघाची धावसंख्या 37/4.
पाहा पोस्ट -
3RD T20I. WICKET! 6.2: Sikandar Raza 15(16) ct Rinku Singh b Washington Sundar, Zimbabwe 37/4 https://t.co/FiBMpdZo0K #ZIMvIND
— BCCI (@BCCI) July 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)