GT vs PBKS, IPL 2024 17th Match: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) 4 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (GT vs PBKS) सामना झाला. गुजरातने प्रथम खेळताना 199 धावा केल्या. शुभमन गिलने 89 धावांची नाबाद खेळी खेळली, तर राहुल तेवतियानेही 23 धावांची झंझावाती खेळी खेळली. 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा संघ सातत्याने विकेट गमावत राहिला. कोणतीही मोठी भागीदारी फुलू शकली नाही, पण दरम्यानच्या काळात शशांक सिंगने पंजाबला सामन्यात परतवून लावले. त्याच्याशिवाय शेवटच्या षटकांमध्ये प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या आशुतोष शर्माने झंझावाती खेळी करत पंजाब किंग्जला 3 गडी राखून विजय मिळवून दिला. पंजाबच्या या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये फरक दिसुन आला आहे. पंजाबने पाचव्या स्थानी तर गुजरातवे सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.

पाहा पॉईंट टेबलची स्थिती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)