Gujarat Giants Women (WPL) vs Delhi Capitals Women (WPL), Womens Premier League 2025 17th Match: महिला प्रीमियर लीग 2025 चा कारवां आता लखनौला पोहोचला आहे. या हंगामातील 17 वा सामना आज म्हणजेच 7 मार्च रोजी गुजरात जायंट्स महिला क्रिकेट संघ (WPL) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स महिला क्रिकेट संघ (WPL) यांच्यात भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या हंगामात, गुजरात जायंट्सचे नेतृत्व अॅशले गार्डनर करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान मेग लॅनिंगच्या खांद्यावर आहे. दरम्यान, या रोमांचक सामन्यात गुजरात जायंट्सचा कर्णधार अॅशले गार्डनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
गुजरात जायंट्स: बेथ मुनी (यष्टीरक्षक), दयालन हेमलता, हरलीन देओल, अॅशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, फोबी लिचफिल्ड, भारती फुलमाळी, काशवी गौतम, मेघना सिंग, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा.
दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, जेस जोनासेन, सारा ब्राइस (यष्टीरक्षक), निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, तितास साधू.
Another playoffs for Delhi Capitals! Gujarat Giants, though, still have work to do 👀
Ashleigh Gardner wins the toss & GG bowl first in Lucknow
Follow live: https://t.co/AVJoBASwkW | #WPL2025 pic.twitter.com/jLIl36lw2T
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)