MI vs GG WPL 2025 Eliminator Match: महिला प्रीमियर लीग 2025 चा एलिमिनेटर सामना आज 13 मार्च रोजी मुंबई इंडियन्स महिला क्रिकेट संघ (WPL) विरुद्ध गुजरात जायंट्स महिला क्रिकेट संघ (WPL) यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. या हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे. तर, गुजरात जायंट्सची कमान अ‍ॅशले गार्डनरच्या खांद्यावर आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्ससाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल आणि जेतेपदासाठी दिल्ली कॅपिटल्सशी सामना करेल. दरम्यान, गुजरात जायंट्स महिला संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक

गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (विकेटकीपर), काशवी गौतम, हरलीन देओल, ऍशले गार्डनर (कर्णधार), फोबी लिचफील्ड, डॅनियल गिब्सन, भारती फुलमाली, सिमरन शेख, तनुजा कंवर, मेघना सिंग, प्रिया मिश्रा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)