जगभरातील क्रिकेट चाहते अनेक दिवसांपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम तारखांची वाट पाहत आहेत. हा मोठा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. आयसीसीने (ICC) बुधवारी तारखा जाहीर केली आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान ओव्हल, लंडन येथे राखीव दिवसासह (12 जून) खेळला जाईल. गतवर्षी न्यूझीलंडने साउथहॅम्प्टन येथे 2021 च्या फायनलमध्ये भारताचा 8 गडी राखून पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले होते. सध्या, ऑस्ट्रेलिया 75.56 गुणांच्या टक्केवारीसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यांना पात्र होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. यानंतर 58.93 गुणांसह भारताचा क्रमांक लागतो. नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या मालिकेतून अंतिम सामना खेळणारे दोन संघ ठरवले जाऊ शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)