भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेसाठी भारत पाकिस्तानचा दौरा (Team India Tour Pakistan) करणार नसल्याच्या घोषणेनंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठवणार नाही असे म्हटले आहे. यावर आता भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राचा (Akash Chopra) असा विश्वास आहे की पीसीबी आपल्या घोषणेवर टिकून राहू शकत नाही आणि वनडे विश्वचषका 2023 साठी निश्चितपणे आपला संघ भारतात पाठवेल. पुढील वर्षी होणाऱ्या आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानला जाणार नाही आणि एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तान नक्कीच भारतात येईल, असे लिहुन देवु शकतो, असे त्यांनी सांगितले आहे.
#Pakistan will tour #India for 2023 #WorldCup, I can give it in writing, says Aakash Chopra
Read: https://t.co/ooyjRAnfzf@cricketaakash pic.twitter.com/Tu4UsRbsuw
— IANS (@ians_india) October 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)