Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad, 33rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा (IPL 2025) 33 वा सामना आज म्हणजेच 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या हंगामात, मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) करत आहे. तर, सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) खांद्यावर आहे. आतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने मुंबईसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकांत पाच गडी गमावून 162 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्माने 40 धावांची सर्वाधिक खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 28 चेंडूत सात चौकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, हेनरिक क्लासेन 37 धावांचे योगदान दिले.

दुसरीकडे, कर्णधार हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. मुंबई इंडियन्सकडून स्टार अष्टपैलू विल जॅक्सने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. विल जॅक्स व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकांत 163 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)