Gujarat Giants Women (WPL) vs Delhi Capitals Women (WPL), Womens Premier League 2025 17th Match Live Streaming: महिला प्रीमियर लीग 2025 चा कारवां आता लखनौला पोहोचला आहे. या हंगामातील 17 वा सामना आज म्हणजेच 7 मार्च रोजी गुजरात जायंट्स महिला क्रिकेट संघ (WPL) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स महिला क्रिकेट संघ (WPL) यांच्यात भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. या हंगामात, गुजरात जायंट्सचे नेतृत्व अॅशले गार्डनर करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान मेग लॅनिंगच्या खांद्यावर आहे. गुजरात जायंट्सने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. या काळात संघाने तीन जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. सहा गुणांसह, गुजरात संघ पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स संघ 10 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड
महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्स महिला आणि दिल्ली कॅपिटल्स महिला यांच्यात आतापर्यंत पाच सामने खेळले गेले आहेत. या काळात, दिल्ली कॅपिटल्स संघाने वरचढ कामगिरी केली आहे. या पाच सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सने चार सामने जिंकले आहेत. तर, गुजरात जायंट्सने फक्त एकच सामना जिंकला आहे. (हे देखील वाचा: ICC Champions Tophy 2025: गोल्डन बॅटच्या शर्यतीत हे 3 खेळाडू आघाडीवर! विराट कोहली या स्थानावार)
किती वाजता सुरु होणार सामना?
गुजरात जायंट्स महिला आणि दिल्ली कॅपिटल्स महिला यांच्यातील महिला प्रीमियर लीग 2025 चा 17 वा सामना आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. तर टॉसची वेळ त्यापूर्वी अर्धा तास असेल.
कुठे पाहणार सामना?
गुजरात जायंट्स महिला आणि दिल्ली कॅपिटल्स महिला यांच्यातील महिला प्रीमियर लीग 2025 चा 17वा सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, तुम्ही जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
गुजरात जायंट्स: बेथ मुनी (यष्टीरक्षक), दयालन हेमलता, हरलीन देओल, अॅशले गार्डनर (कर्णधार), फोबी लिचफिल्ड, डिआंड्रा डॉटिन, काशवी गौतम, भारती फुलमाळी, तनुजा कंवर, मेघना सिंग, प्रिया मिश्रा.
दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, जेस जोनासन, जेमिमा रॉड्रिग्ज, अॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, सारा ब्राइस (यष्टीरक्षक), निक्की प्रसाद, शिखा पांडे, मिन्नू मणी, श्री चारिनी.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)