RR vs GT, IPL 2024 24th Match: आयपीएल 2024 च्या 24 व्या (IPL 2024) सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात गुजरातने राजस्थानचा तीन गडी राखुन पराभव केला आहे. तत्तपुर्वी, गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 197 धावांचे लक्ष्य दिले. राजस्थानकडून स्टार फलंदाज रायन परागने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. गुजरात टायटन्सकडून मोहित शर्मा, रशीद खान आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. गुजरात टायटन्स संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना 20 षटकांत सात गडी राखून लक्ष्य गाठले. गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक 72 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून कुलदीप सेनने सर्वाधिक तीन बळी घेतले.
Fortress Sawai Mansingh Stadium has been breached 🔥
Tewatia and Rashid ice the end overs to take the Titans home 🥶 pic.twitter.com/oBTaYjf4e1
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)