टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup 2022) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सर्वात उत्सुकतेच्या सामन्यासाठी फारसा वेळ नाही. हा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. या दोन क्रिकेट-वेड्या देशांच्या चाहत्यांनी प्रसिद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे या हाय-प्रोफाइल सामन्याची तिकिटे काही महिने आधीच बुक केली होती, हवामानामुळे त्यांची स्वप्ने खराब होऊ शकतात (Weather Updates) परंतु आताच नुकताच आलेल्या बातमीनुसार पाऊस थांबला आहे. खेळपट्टी सुकविण्यासाठी MCG आणि कव्हर काढले आहे. उद्यापर्यंत एमसीजीचे हवामान कसे राहील हे पाहणे बाकी आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्याला एकच आशा असेल की उद्या हवामान साथ देईल आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय, पूर्ण थाटामाटात आणि सामना होईल.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)