IND vs ENG T20 WC 2024 Semi-Final 2: टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सुपर-8 च्या महत्त्वाच्या सामन्यात कांगारूंना पराभूत केल्यानंतर आता टीम इंडिया उपांत्य फेरीत ब्रिटीशांशी लढणार आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अफगाणिस्तानचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. म्हणजेच आजचा विजयी संघ 29 जून रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. दरम्यान, नाणेफेक भारतीय वेळेनुसार रात्री 8.50 वाजता होईल. त्याच वेळी, पहिला चेंडू नऊ ते नऊ वाजता टाकला जाईल. मैदानाची पाहणी केल्यानंतर पंचांनी हा निर्णय घेतला आहे. सध्या गयानमध्ये सूर्यप्रकाश आहे आणि आकाशही निरभ्र आहे. चाहत्यांना पूर्ण सामन्याची अपेक्षा असेल.
🚨 UPDATE 🚨
Toss at 11.20 Local Time (08.50 PM IST).
Start of Play at 11.45 Local Time (09.15 PM IST).
Follow The Match ▶️ https://t.co/1vPO2Y5ALw #T20WorldCup | #TeamIndia | #INDvENG
— BCCI (@BCCI) June 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)