Rishabh Pant Car Accident: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) रुरकीजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ पंतचे प्राण वाचवण्यात घटनास्थळी मदत करणाऱ्या दोन हरियाणवासींचे विशेष योगदान होते. जो अपघात होताच घटनास्थळी पोहोचले. हरियाणा रोडवेजच्या पानिपत डेपोच्या चालक आणि ऑपरेटरने घटनास्थळी समजूतदारपणा दाखवून ऋषभ पंतचे प्राण वाचवले. त्यांनी ऋषभला गाडीतून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये पाठवले. या केलेल्या मदतीमुळे पानिपत रोडवेजचे जीएम कुलदीप जगदा यांनी ड्रायव्हर सुशील कुमार आणि ऑपरेटर परमजीत यांचा गौरव केला आहे.
Two heroes - Sushil Kumar and Paramjeet getting honoured for helping Rishabh Pant. pic.twitter.com/NQpLByaV9Z
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)