Anya Shrubsole Announces Retirement: इंग्लंडची महिला सुपरस्टार आणि विश्वचषक विजेती अन्या श्रबसोल हिचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय

इंग्लंडची दिग्गज महिला क्रिकेटपटू आणि 2017 च्या विश्वचषक विजेत्या अन्या श्रबसोलेने तात्काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. 30 वर्षीय श्रबसोलने इंग्लंडसाठी 173 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 227 विकेट्स घेतल्या. श्रबसोल दोन ऍशेस-विजेते आणि दोन विश्वचषक-विजेत्या इंग्लंड संघाची महत्वाची खेळाडू होती. दरम्यान तिने यापुढे देशांतर्गत क्रिकेट खेळणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Anya Shrubsole Announces Retirement: इंग्लंडची महिला सुपरस्टार आणि विश्वचषक विजेती अन्या श्रबसोल हिचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय
अन्या श्रबसोल (Photo Credit: Twitter/EnglandCricket)

इंग्लंडची दिग्गज महिला क्रिकेटपटू अन्या श्रबसोल (Anya Shrubsole) हिने तात्काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. इंग्लंडची सुपरस्टार गोलंदाजाने तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण म्हणून 2017 विश्वचषक विजयाची आठवण केली. 14 वर्षे खेळणे तिला अभिमानास्पद वाटते. 2017 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लिश संघात (England Cricket Team) श्रबसोल ही महत्त्वाची खेळाडू होती. तिने नऊ सामन्यांमध्ये 25.33 वेगाने 12 विकेट घेतल्या. यामध्ये लॉर्ड्सवर भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात सहा विकेट्सचा समावेश होता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2022 04:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).