आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (SA vs AUS) यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा दुसरा (ICC World Cup 2023) सेमीफायनल सामना खेळला गेला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला 49.4 षटकांत केवळ 212 धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी स्टार फलंदाज डेव्हिड मिलरने 101 धावांची शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने अवघ्या 47.2 षटकांत सात गडी गमावून लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 62 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सी आणि जेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)