Ashes 2021-22: मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) यांच्यात अॅशेस मालिकेतील (Ashes Series) तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. जो रूटचा (Joe Root) इंग्लिश संघ दुसऱ्या डावात 31 धावांत 4 गडी गमावून संघर्ष करत असून टीमवर सलग तिसऱ्या पराभवाचे संकट ओढवले आहे. ब्रिटिश संघ 51 धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तत्पूर्वी, इंग्लंडच्या 185 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 267 धावांवर आटोपला.
Stumps on day two in Melbourne 🏏
Simply incredible from Australia as they end the day with a bang 💥#AUSvENG | #WTC23 pic.twitter.com/Xqm6KjWPFZ
— ICC (@ICC) December 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)