IND vs NZ 1st T20: पहिल्या T20 मध्ये न्यूझीलंडने भारतावर 21 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या. डेव्हन कॉनवेने 52 आणि डॅरिल मिशेलने नाबाद 59 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 155 धावाच करू शकला. या दरम्यान, अर्शदीप सिंहने पुन्हा चाहत्यांची निराशा केली आहे. अर्शदीपने आपल्या पहिल्याच षटकात 2 वाईड चेंडू टाकले आणि एकूण 11 धावा दिल्या. त्याच्या दुसऱ्या षटकातही त्याने 11 धावा दिल्या ज्यात एका चौकारासह 1 षटकाराचा समावेश होता. अर्शदीपने आपल्या तिसऱ्या षटकात अवघ्या 2 धावा देत अर्धशतक खेळत असलेल्या डेव्हन कॉनवेला बाद केले. अर्शदीपने शेवटच्या षटकात त्याची कामगिरी खराब केली. त्याने 1 नो बॉलसह 3 षटकारांसह 1 चौकारासह एकूण 27 धावा दिल्या. त्याच्या खराब गोलंदांजी मुळे नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केल आहे.
Contrasting fortunes for Arshdeep Singh.#ArshdeepSingh #India #INDvsNZ #Cricket #T20Is pic.twitter.com/qDG8YwR0Yh
— Wisden India (@WisdenIndia) January 27, 2023
Nothing, Arshdeep Singh is just missing Babar Azam to be on strike these days ?#INDvNZ pic.twitter.com/Zzx0zK5O4e
— Akshat (@AkshatOM10) January 27, 2023
Arshdeep Singh throwing no ball in every match ? #NZvsIND pic.twitter.com/erpSatOCge
— Kanishka (@Kanishka018) January 27, 2023
Arshdeep Singh ?? pic.twitter.com/ObALrNtiK0
— Gautam//Patrick Bateman version (@idcyar) January 27, 2023
That too in just 24 deliveries ?#NoBalls #arshdeepsingh #INDVsNZT20 pic.twitter.com/oBRqLq3i5i
— Virat_Spare (@Virat__spare) January 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)