कार फेरीवर चढत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट पाण्यात कोसळली. ही कार कुझिक्कट्ट मुहम्मद हनीफा आणि त्यांच्या कुटुंबाची होती, जे परप्पानंगडीतील चेट्टीप्पडी येथील रहिवासी होते. गाडीत तीन मुले, तीन महिला आणि एक पुरूष होता. कार नदीत बुडाल्याने या सर्वांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.
...