IND vs SL 1st ODI: श्रीलंका आणि भारत (SL vs IND) संघ आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आमनेसामने आहेत. सामन्याच्या सुरुवातीला यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान विराट कोहलीने आपल्या अनोख्या डान्स मूव्हने चाहत्यांना खूश केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. झाले असे की, या षटकातील चौथ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमाने शॉट खेळला, पण चेंडू त्याच्या बॅटला नीट लागला नाही. चेंडू कव्हरच्या दिशेने हवेत गेला आणि विराट कोहलीने सोपा झेल घेतला. कॅच घेतल्यानंतर विराट कोहली खूप आनंदी दिसला आणि अनोख्या पद्धतीने तो साजरा केला.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)