IND vs AFG T20 Series 2024: टीम इंडिया (Team India) आता या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) तयारीला सुरुवात करणार आहे. लवकरच अफगाणिस्तान क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर (Afghanistan Tour India) येणार असून तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका IND vs AFG T20 Series 2024) खेळवली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात 11 जानेवारीपासून मोहालीत होणाऱ्या सामन्याने होणार आहे. दरम्यान, या मालिकेसाठी अफगाणिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. तसेच संघात 19 खेळाडूंना संधी देण्यात आली असुन इब्राहिम झद्रानच्या हाती संघाची कमान सोपवण्यात आली आहे. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 मालिकेसाठी अशी असू शकते Team India, 'या' खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता)

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ

इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इक्रम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमउल्ला ओमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशिद खान.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)