IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 क्रिकेट मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचीही या मालिकेत पहिली कसोटी लागणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाच्या जर्सीत एक खास बदल करण्यात आला आहे, ज्याचे कारण जाणून तुम्हीही खूश व्हाल. टीम इंडियाने नुकतेच टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 17 वर्षांनंतर टी-20 क्रिकेटचे विजेतेपद पटकावले. संघ चॅम्पियन झाल्यानंतर संघाच्या जर्सीत विशेष बदल करण्यात आला आहे. आता भारतीय संघाच्या जर्सीवर बीसीसीआयच्या लोगोवर एकाऐवजी दोन स्टार लावण्यात आले आहेत. टीम इंडिया या नव्या जर्सीमध्येच श्रीलंकेविरुद्ध सामना खेळताना दिसणार आहे.
Recharged and raring to go. See you on the pitch 🇮🇳💙 pic.twitter.com/mpCBXe7XFk
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) July 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)