IND vs ZIM 2nd T20I: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने भारतीय संघाचा 13 धावांनी लाजीरवाणा पराभव केला. भारतीय फलंदाज पुर्णपणे फ्लाॅप ठरले. याच पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय युवा संघ आज मैदानात उतरणार आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने कारकिर्दीतील दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिले शतक झळकावले. अभिषेक शर्माने अवघ्या 46 चेंडूत शतक झळकावले आहे. त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 8 षटकार आले. मात्र, शतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.
One Sharma retired from T20i cricket, the other Sharma took over. 🫡 pic.twitter.com/l5EfEyxuM9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)