MI vs CSK: आयपीएल 2024 मधील 29 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात (MI vs CSK) खेळला जात आहे. या सामन्यात सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनीचे (MS Dhoni) वादळ पाहायला मिळाले. फलंदाजी करताना धोनीला फक्त 4 चेंडू खेळायला मिळाले आणि या चार चेंडूंवर धोनीने 3 शानदार षटकार ठोकून चाहत्यांना नाचायला भाग पाडले. शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) एमएस धूतले. शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डॅरिल मिशेल बाद झाल्यानंतर एमएस धोनी (MS Dhoni) फलंदाजीसाठी क्रिजवर आला आणि तो क्रीझवर येताच प्रेक्षकांना धोनीची जादू पाहायला मिळाली. धोनी येताच त्याने हार्दिकला पहिल्याच चेंडूवर जोरदार षटकार ठोकला. धोनीने या षटकात 3 शानदार षटकार मारले आणि तिन्ही षटकार वेगवेगळ्या दिशेने मारले गेले. फलंदाजी करताना धोनीने अवघ्या 4 चेंडूत 20 धावा केल्या.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)